Abhang : सुंदर ते ध्यान | Sundar Te Dhyan ( Raaga : Madhuvanti & Mishra Kalavati ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवोनिया || १ ||
तुळसीहार गळा कासे पितांबर | आवडे निरंतर तेची रूप || २ ||
मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभ मणी विराजित || ३ ||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने || ४ ||
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले