अभंग – धन्य आजी दिन | Dhanya Aaji Din ( based on Classical Raaga : Desh & Hindol ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मी चा क्षीण गेला ।। १ ।।
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ।। २ ।।
त्रिविध तापाची झाली बोळवण । देखिले चरण वैष्णवांचे ।। ३ ।।
एका जनार्धानी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी | | ४ | |
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले