अभंग – देवा माझे मन | Deva Majhe Man ( based on Classical Raaga : Khambavati & Tilang(Mishra) ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल…by Rutuja Khandbahale
देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥
नामस्मरण घडो संत समागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
आणिक मागणे नाही नाही देवा ।एका जनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले