अभंग – Jayachiye Dvari | जयाचिये द्वारी ( based on Classical Raaga :Kedar & Kalavati ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ ।
अंगी ऐंसें बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय महाराज ।
परि पाहे बीज शुध्द अंगी ॥२॥ धृ
जयाने घातली मुक्तीची गवांदी ।
मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें ।
राहे समाधानें चित्ताचिया ॥४॥
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले