अभंग – रुपी जडले लोचन । Rupi Jadale Lochan वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
रुपी जडले लोचन ।
पायी स्थिरावले मन || १ ||
देह भाव हरपला ।
तुझ पाहता विठ्ठला || २ ||
काळो नये सुखदु:ख ।
तहान हरपली भूक || ३ ||
तुका म्हणे नव्हे परती ।
तुझ्या दर्शने मागुती || ४ ||
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे