अभंग – सेवा ते आवडी | Seva Te Avadi ( based on Classical Raaga : Bhupali & Kalavati ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
सेवा ते आवडी उच्चारावे नाम ।
भेदाभेदकाम निवारुनि ।।१।।
न लगे हालावे चालावे बाहेरी ।
अवघेचि घरी बैसलिया ।।२।। धृ ।।
देवाचीच नावे देवाचिये शिरी ।
सर्व अलंकारी समर्पावी ।।३।।
तुका म्हणे होय भावेचि संतोषी ।
वसे नामापाशी आपुलिया ।।४।।
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.ब.प. श्री. दशरथ महाराज घुले