अभंग – येगं येगं विठाबाई | Yega Yega Vithabai ( based on Classical Raaga : Bhairavi ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
येगं येगं विठाबाई ।
माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा ।
तुझे चरणीच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें ।
माझे रंगणीं नाचावें ॥३॥
माझा रंग तुझे गुणीं ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.भ.प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले