गौळण: पाणीयासी कैसी आता | वारकरी सांप्रदाय चाल- ह. भ. प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले, महिरावणी

गौळण: पाणीयासी कैसी आता | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल – ह. भ. प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले, महिरावणी

पाणीयासी कैसी आता एकली मी जाऊ ।
वाटेमध्ये उभा कान्हा काय त्यासी काय देऊ ।।१।।धृ

कुंभ घेऊनिया शिरी जात होते यमुने तीरी ।
वाटेमध्ये उभा कान्हा काय त्यासी काय देऊ ।।२।

मुरली घेऊनिया करी वाजवितो तो श्रीहरी ।
नाद येतो कवने द्वारी कृष्ण कोठे पाहू ।।३।।

जिकडे पाहे तिकडे हरी वीण दुजे नाही ।
एका जनार्दनीं आई कृष्ण कोठे पाहू ।।४।।

Singer : ह. ब. प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले, महिरावणी
Video Credits : Aishwarya Vilas Khandbahale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2025 Mukta - WordPress Theme by WPEnjoy