अभंग – करूनी विनवणी | Karuni Vinavani
वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
करूनी विनवणी पायी ठेवितो माथा |
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा || १ ||
अखंडित असावे ऐसे वाटते पायी |
सहोनि संकोच ठाव थोडासा देई || २ ||
असो नसो भाव आलो तुझीया ठाया |
कृपादृष्टीपाहे मजकडे पंढरीराया || ३ ||
तुका म्हणे तुझी आम्ही वेडीवाकुडी |
नामे भवपाश हाते आपुल्या तोडी || ४ ||
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे