Kailasicha Dev Bhola | कैलासींचा देव भोळा | श्रावणी सोमवार स्पेशल | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल

अभंग – Kailasicha Dev Bhola | कैलासींचा देव भोळा |
वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale

कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती ।
पार्वतीचा पति योगिराज ।।१।।

तयाचिया पाया माझे दंडवत ।
घडो आणि चित्त जडो नामीं ।।२।।

जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं ।
तिजा नेञज्वाळी जातदेव ।।३।।

कंठी काळकूट डौर ञिशूळ हातीं ।
सर्वांगी विभूति शोभतसे ।।४।।

गळां रुंडमाळा खापर हस्तकीं ।
रामनाम मुखीं सर्वकाळ ।।५।।

व्याघ्रचर्मधारी स्मशानीं राहिला ।
संगे भूतमेळा विराजित ।।६।।

नामा म्हाणे नामें नासोनियां पाप ।
करी सुखरुप भक्तांलागी ।। ७ ।।

Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : ह.भ.प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2025 Mukta - WordPress Theme by WPEnjoy