अभंग – Yogiya Durlabha | योगीया दुर्लभ
वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां पाहतां मना न पुरे धणी ॥१॥
देखिला देखिला गे माये देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंत रूपें अनंत वेषें देखिला म्यां त्यासि ।
बाप रखुमादेवी-वरूं खूण बाणली कैसी ॥३॥
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे

