अभंग – Ravi Dip Hira | रवि दिप हिरा ( based on Classical Raaga : Bhairavi ) वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
रवि दीप हिरा दाविती देखणे ।
अदृश्य दर्शने संतांचिया ।। १
त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर ।
न कळे साचार ब्रह्मादिका ।।
तापली चंदन निववितो कुडी ।
त्रिगुण तो काढी संतसंग ।।
मायबापे पिंड पाळीयेला माया ।
जन्ममरण जाया संतसंग ।।
संतांचे वचन वारी जन्मदुःख ।
मिष्टान्न ते भूक निवारण ।।
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे ।
संतचरणी भावे रिघावया ।।
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे