अभंग – Jalo Majhe Karma Vaya | जळो माझे कर्म वाया | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
जळो माझे कर्म वाया केली कटकट।
झाले तैसे तंट नाही आले अनुभवा ।।१।।
आता पुढे धीर काय देऊ या मना।
ऐसे नारायणा प्रेरीले ते पाहिजे ।।२।।
गुणवंत केलो दोष जाणायासाठी।
माझे माझे पोटी बळकट दुषण ।।३।।
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा।
बरवा हा लळा पाळीयेला शेवटी।।४।।
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे