अभंग – Aapuliya Hita Jo Ase Jagata | आपुलिया हिता जो असे जागता | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
आपुलिया हिता जो असे जागता।
धन्य मातापिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण।
अखंड चिंतन विठोबाचे ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाही॥४॥
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे