अभंग – Tuj Save Aamhi Anusarlo Abala | तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Khandbahale
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा |
नको अंगी कळा राहो हरि हीन देऊ || १ ||
सासुरवासा भितो जीव ओढे तुजपाशी |
आता दोहीविशी लज्जा राखे आमुची || २ ||
न कळता संग झाला सहज खेळता |
प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरी || ३ ||
तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे |
वचन या भावे वेचुनिया विनटलो || ४ ||
Singer : ऋतुजा खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे