Bhagvan Shriram Navami Pravachan | Ram Navami Special | By Rutuja Sunil Khandbahale

Bhagvan Shriram Navami Pravachan | Ram Navami Special | By Rutuja Sunil Khandbahale #ramnavmispecial #pravachan

अभंग : उत्तम हा चैत्रमास |

उत्तम हा चैत्रमास । त्रृतु वंसताचा दिवस ।।१।।

शुक्ल पक्षी ही नवमी । उभें सुरवर ते व्योमीं ।।२।।

माध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ।।३।।

धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशी चक्रपाणी ।।४।।

सुशोभित दाही दिशा ।आनंद नरनारी शेषा ।।५।।

नाहीं कोसल्येसी भान । गर्भी आले नारायण ।।६।।

अयोनी संभव । प्रकटला हा राघव ।।७।।

नामा म्हणे डोळां । पाहीन भुवनत्रयपाळा ।।८।।

अभंग : झाले रामराज्य काय उणे आम्हासी |

झाले रामराज्य काय उणे आम्हासी |
धरणी धरी पिक गाई ओविल्या म्हशी || १ ||

राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये|
दळीता कांडिता जेवितागे बाइये || २ ||

स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा |
नामाचा गजर भय सुटला कळीकाळा || ३ ||

तुका म्हणे रामे सूख दिधले आपुले |
तया गर्भ वासा येणे जाणे खुंटले || ४ ||

Pravachankar : Rutuja Sunil Khandbahale
Video Editing Credits : Rutuja Sunil Khandbhale
Master/Guru : ह. भ. प. श्री. शिवाजी गंगाधर खांडबहाले, महिरावणी, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy