Chale He Sharir Konachiye Satte | चाले हे शरीर कोणाचिये सत्ते | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल |

अभंग – Chale He Sharir Konachiye Satte | चाले हे शरीर कोणाचिये सत्ते | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल by Rutuja Sunil Khandbahale

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते |
कोण बोलवितें हरीवीण || १ ||

देखवी ऐकवी एक नारायण |
तयाचें भजन चुकों नको || २ ||

माणसाची देव चालवी अहंता |
मीचि एक करता म्हणों नये || ३ ||

वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता |
राहिली अहंता मग कोठें || ४ ||

तुका म्हणे विठो भरला सबाह्य |
उणें काय आहे चराचरीं || ५ ||

Singer : ऋतुजा सुनिल खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2024 Mukta - WordPress Theme by WPEnjoy