गौळण – Dudivar Dudi Gaulani Saate Nighali | दुडीवर दुडी गौळणी साते निघाली | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल
दुडीवर दुडी गौळणी साते निघाली |
गौळण गोरस म्हणों विसरली || १ ||
गोविंदु घ्या कोणी दामोदरु घ्या गे |
तंव तंव हांसती मथुरेच्या गे || २ ||
दुडिया माझारीं कान्होबा झाला भारी |
उचंबळे गोरस सांडे बाहेरी || ३ ||
एकाजनार्दनी सबरस गौळणी |
ब्रम्हानंद न समाये मनीं || ४ ||
Singer : ऋतुजा सुनिल खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे