अभंग – Bhave Gave Geet | भावे गावे गीत | वारकरी सांप्रदाय पारंपारिक चाल | by Rutuja Sunil Khandbahale
भावे गावे गीत | शुद्ध करोनिया चित्त || १ ||
तुज व्हावा आहे देव | तरी हा सुलभ उपाव || २ ||
आणिकांचे कानी | गुणदोष मना न आणी || ३ ||
मस्तक ठेंगणा | करी संतांच्या चरणा || ४ ||
वेची ते वचन | जेणे राहे समाधान || ५ ||
तुका म्हणे फार | थोडा तरी परोपकार || ६ ||
Singer : ऋतुजा सुनिल खांडबहाले
Master : गुरुवर्य डॉ. श्री. किसन महाराज साखरे